बसमधे गर्दी, ट्रेन मधे गर्दी
पुलावर गर्दी, रस्त्यावर गर्दी
आणि गर्दीत मी ....रोज गुदमरताना;
तरीही गर्दीत मी.टिकलीएवढ्या बेटा सारखी
प्रत्येक चेहरा....एक एक बेट
वरवर हिरवंगार दिसणारं
खाली खोल काळं खडकाळ
वर्षानुवर्ष झिजणारं
ह्या सर्व बे्टां मधे एक अजब संपर्क
मी; ही संपर्कखूण शोधत
अद्रुष्य होत
गर्दीच वेढून घेत गर्दीचं बोट धरते



वा, कविता छान आहेत. तू कविता लिहायला हव्यास.
ReplyDeleteमिलिंद