Friday, 24 September 2010

कधी
शब्द तुझ्या माझ्यातले
ही मनाची भूक होते
समोर तू असलास की
मी कशी मूक होते

कारण
शब्दान्चीही फार आता
वाटू लागली भीती
ओतले  पसाभर तरी
नाहीं अर्थाची क्षीती
पण
नि:शब्दता अर्थपूर्ण 
आता तीचाच आधार
अर्थहीन विचारांचा
सोसवेना आता भार
तरीही
निघे मनाची कड़ी
विचार सुट्ती मोकाट
गुंतून भाव गुन्त्यात
मृगजल होई वाट

वाटे
कुठली ही वाट मनाची
रस्ते ही कुठले कुठले
फिरता शब्द दाही दिशा
प्रश्न नाही सुटले सुटले

मात्र
उरे प्रश्नांचीच साथ 
शब्दांच्या वाटेवरी
अल्प स्वल्प विरामचिन्हे
सोबतीला कधीतरी
अवतरण ,उदगारचिन्हे  
असती शब्दांचा श्वास
प्रश्न असे प्रारब्ध जरी
पूर्ण विरामाचा ध्यास 
..................................मधुवंती

No comments:

Post a Comment