Saturday, 11 August 2012
चिंब भिजतोय कडूनिंब माझ्यादेखत
माझे डोळे भिजवत त्याला सोडून जाताना
किती किती त्याला सांगितले जे त्याला कळले
त्याला कुरवाळले त्याला प्यायले डोळ्यांनी
त्याला खाल्लेसुध्धा..पण मिठी नाही मारता आली
मावतच नाही कवेत तो अस्ताव्यस्त पसरलेला
हिरवीगर्द माया करत राखण करत बसलेला
ह्याला कसा सोडू ..ह्याचं काय करू ?
माणसांमधून सुटताना झाडात अडकतेय ?
मला झाड लागलंय..बहुतेक...


