कभी खुद्पे कभी हालातपे रोना आया
बात निकली तो हर एक बात पे रोना आया ....
साहीर लुधियानवीच्या दोन प्रेमप्रकरणात त्याला अपयश आल असं म्हणतात . प्रेमात यश -अपयश अस काही असत का?प्रेमाचा यशस्वीपणा म्हणजे फार भांडण न होता दीर्घकाळ टिकलेला विवाह असा आपल्याकडे एक आवडता समज आहे. प्रेमाचा यशस्वी अविष्कार उत्तम भावनिक साथ का नाही ? मग ती कोणाहीबरोबर असो, त्यात शारिरीक जवळीक असो वा नसो ,पण हे सर्व वैवाहिक चौकटीत असो हा नैतिक सांस्कृतिक आग्रह कशासाठी ? साहीर अमृता प्रीतमचा प्रियकर . अमृता प्रीतम पन्नासच्या दशकातली पंजाबी समाजातली बंडखोर विचारांची लेखिका -कवियत्री . हे प्रेमप्रकरण त्याकाळात खूप चवीने चघळल गेलं. कलावंत नेहमीच समाजातील प्रचलीत नैतिक मूल्य निष्ठेने जगू शकत नाहीत. त्याचं वैचारिक जग भावनावर उभारलेल अधिक असत, स्वताच्या आणि इतरांच्या भावनांची जाणीव खोल विस्तृत आणि प्रगल्भ असते . भाव -जाणीवांच्या द्वंद्वातून निर्माण होणार जीवन -नाट्य कलावंत समजून उमजून असतात ते तसं कधीतरी प्रत्यक्ष जगल्यामुळे .
जीवन -नाट्याची, मन संघर्षांची नीट उकल करून ते कलाकृतीतून मांडायला एक अलिप्तता असावी लागते ...स्वताकडे पर्यायाने स्वताच्या अनुभवांकडे पाहण्याची एक नजर तिसर्या डोळ्यासारखी बुद्धीच्या आधारे तयार करावी लागते. तेव्हाकुठे स्वत न जगलेले क्षण वाचक वा प्रेक्षक जगू शकतात . हे क्षण निर्माण होण्यासाठी मन धीट व्हाव लागत एवढंच नाही तर कालबाह्य अनुभव घ्यायची तयारी असावी लागते . अशा अनुभवातून तावून सुलाखून निघाल्यावर मग ते अलिप्ततेने व्यक्त करण्याची कुवत असावी लागते . ही सर्व प्रक्रिया अनेकदा झाल्यावर कलावंत लेखक विचारवंत जन्मतो
वरच्या दोन ओळी सामान्य माणसंही अनुभवतात -अनेकदा . चित्रपटातल्या दोन्ही व्यक्तीरेखा प्रेमाला पारख्या झालेल्या . साहीर स्वताचा प्रेमाबद्दलचा विचार सांगतोय का? शक्य आहे अगदी शक्य आहे ....प्रिय व्यक्तीच्या सहवासात असण आणि तिच्या जाणीव नेणीवेत असण दोन्ही सारखंच महत्वाच ....




